मराठी विनोद ...............१४ - मराठीसृष्टी (Marathisrushti) : हलकं फुलकं


Members Login :
Login ID :
Password :
   

Mayboli (Marathi Typing Software)

मराठी विनोद ...............१४
........NetSource   



सिग्नल तोडून आलेल्या मोटारसायकल चालकाला पोलिसाने अडवले. डायरी काढून दरडावतच नाव विचारले, तो सांगू लागला, ‘‘माझे नाव याज्ञवल्क्यदास रामानुजाचार्यचरणकमल युयुत्सु ऐतरिय ब्रह्मज्ञान विलासी....’
‘थांब, पहिली चूक म्हणून सोडून देतो.’ पोलीस म्हणाला.

 

शाळा तपासनीस एका वर्गात गेले आणि एका विद्यार्थ्याला प्रश्नाचे उत्तर विचारले, ‘‘माझ्या गावात तीस फूट खोल असलेली विहिर आणि पन्नास नारळाची झाडं आहेत तर माझं वय काय असेल ?’’
विद्यार्थ्याने थोडावेळ विचार करून सांगितले, ‘‘सत्तेचाळीस.’’
‘‘बरोबर, पण कसं ओळखलंस ?’’
‘‘सोप्पं आहे, काल आमच्याकडे कर्टूल्याची भाजी केली होती आणि गावात सोंगाड्या चित्रपट लागला होता त्यावरून .

 

‘‘लोक स्थळ काळ न पहाता पार्टीत सुद्धा सल्ला विचारतात याचा तुला त्रास नाही का होत ?’’ एका डॉक्टरने आपल्या दुसर्‍या डॉक्टर मित्राला विचारले.
त्यावर तो डॉक्टर म्हणाला, ‘‘मला नाही त्रास होत. मला अशा ठिकाणी
कुणी सल्ला विचारला तर मी लगेच सांगतो. कपडे काढून टेबलावर झोपा. मी तपासून सांगतो !’’

 

अगदी गुप्त रहस्य म्हणजे काय ?
तर जे आपण एकावेळी, एकालाच सांगतो ते !
आणि थोडाच वेळात जे पुन्हा भयानक आणि प्रचंड विस्तारीत होऊन आपल्या कानी पडतं ते ! नाही तर ते रहस्य आहे हे आपल्याला कसे कळणार ?

 

शिपायाची का होईना पण दिनूला एका मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली. पहिल्याच दिवशी पॉश आफिस पाहून तो भारावला. त्याने उत्सुकतेने इंटरकॉम उचलला. दिनू थाटात म्हणाला, ‘‘एक कप चहा पाठवा.’’ पण तो फोन होता मुख्य बॉसचा.
बॉस रागाने म्हणाला, ‘‘कोण आहे ? कुणाशी बोलताय माहीत आहे का ?’’
दिनूने विचारले, ‘‘तुम्ही कुणाशी बोलताय हे माहीत आहे का ? ‘‘नाही’’ बॉस म्हणाला.
‘‘थॅक्स गॉड’’ म्हणत दिनूने रिसिव्हर खाली ठेवला.

 

‘‘तू जर दारू प्यायचे व्यसन सोडले तर तुला लाख रुपये देईन. असे वडील म्हणाले.’’ गोविदा रामूला सांगत होता.
‘‘मग तरीही तू दारू सोडली नाहीस ?’’ असे रामूने विचारताच गोविदा म्हणाला, ‘‘दारू प्यायचीच नाही तर लाख रुपये घेऊन काय करू ?’’

 

शिवकुमार हा प्रतिभावान नट आणि नकलाकार होता. एका पार्टीत त्याने ‘बहारो फुल बरसाओ’ हे गाणं सादर करून वाहवा मिळवली. एक अभिनेत्री लाडात येऊन म्हणाली, ‘‘अरे वा ! तुम्ही इतके छान गाता मला माहीतच नाही.’’
त्यावर शिवकुमार म्हणाले, ‘‘छे, छे मला अजिबात गाता येत नाही. मी फत्त* महमद रफी यांची नक्कल केली !’’

 

 

‘‘सर वर्गात फळ्यावर काय लिहितात ते मला दिसत नाही.’’ इतके बोलून बाळू पुढे काही सांगणार तोच बाळूचे वडील त्याला घेऊन थेट डोळ्याच्या डॉक्टरांकडे घेऊन गेले. डॉक्टरांनी बाळूला
तपासले व विचारले, ‘‘अरे, तुझे डोळे तर चांगले आहेत मग दिसत का नाही ? ’’
‘‘काय करणार माझ्यापुढे एक उंच सरदारजी मुलगा बसतो. त्याच्या पगडीमुळे मला फळाच दिसत नाही.’’

 

वर्गातील प्रत्येक मुलाची शिक्षक माहीती लिहून घेत होते. एकेका मुलाला विचारता विचारता ते नंदू जवळ आले, ‘‘तुझे
वडील काय काम करतात ?’’ नंदूला मास्तरांनी विचारले.
‘‘आई सांगेल ते सर्व !’’ नंदूने उत्तर दिले.

 

प्रभाकरला बर्‍याच दिवसात त्याच्या साहेबांनी पगारवाढ दिली नव्हती. पण प्रभाकरचा स्वभाव मूळचा भिडस्त असल्यामुळे विचारायचे कसे हा त्याला प्रश्न होता. पण एक दिवस हिमत करून त्यानी साहेबांना विचारले, ‘‘साहेब, माझी बायको म्हणाली की, साहेबांना विचारा पगार वाढवता का म्हणून ?’’ त्यावर त्याच्या साहेबांनी उत्तर दिले, ‘‘मग मी ही माझ्या बायकोचा सल्ला घेऊन तुला कळवतो ?’’

 

 

Please Use This Link To Refer This Article : http://articles.marathisrushti.com/?article=111


IMP Note: Contents on this website are uploaded by individual users who have been provided access to do so. While we respect the copyrights, Marathisrushti.com does not accept any responsibility of any copyright violation where the content/ image has been uploaded by any of our registered user. If any content/image contained on this site violates any copyrights, please notify us so that we can take further corrective action.



नविन प्रतिक्रिया

 vijay  
I think this is such nice Jokes.
Everyone must read this Jokes.
Thanks for sharing.....
:)

Date : 26-02-2010

 malik  
bahatreen nice joke thank's

Date : 15-02-2010

 Welcome  
Khupach Chaan !! ha ha ha

Date : 17-01-2010




आपली प्रतिक्रिया कळवा
 
आपल्या मित्रांना कळवा
Typing Language:
Select Keyboard:




 
© 2010 Langindia Infoservices Private Limited
 
 
Technology and Hosting Services Provided by Mastermind Technologies
(Best viewed @ 1024x768 Resolution and up,Recommended Browser IE 6.0 +)
 


A Marathi Mega Web Portal covering every aspect of marathi people, marathi community, marathi articles, marathi literature, Maharashtras culture, travel, arts, anything and everything about Marathi and Maharashtra. List yourself in Marathi Vyakti Sandarbh Kosh, the first and only Marathi People Encyclopedia. Marathi a regional language of India, is widely spoken in western India. Create you own blog, write articles post comments and much more.