मेघमल्हार. . . - मराठीसृष्टी (Marathisrushti) : साहित्य/ललित लेखन


Members Login :
Login ID :
Password :
   

Mayboli (Marathi Typing Software)

मेघमल्हार. . .
........नीतिन दत्तात्रेय आरेकर   


१९८९ च्या आषाढाचा पाऊस धुँवाधार कोसळत होता. झाडपाल्यांना उभा आडवा झोडपत होता. कर्जतजवळच्या आंजपच्या गावातून कशेळे मार्गे मी मोटारसायकल हाणत कर्जतच्या दिशेने निघालो होतो. आकाशात वीजा कडाडत होत्या. कशेळे गावापासून आंजप गाव चार किलोमीटर दूर. रस्ता सुंदर वळणा वळणांचा. सपाट मैदान, पश्चिमेकडे माथेरानचा डोंगर, पूर्वेला भीमाशंकर, मध्ये काळाशार रस्ता, नुकताच बनवलेला. सगळीकडे हिरव्या रंगाची मखमली पखरण! वारा मोटारसायकलीला हेलपाटत होता. पण पावसात भिजायची गंमत होती.

माझी मोटारसायकल मी कशेळे गावातून कर्जतच्या दिशेने वळवली. नाशिक-मुरबाड-कर्जत-चौक असा तो
रस्ता. तसा राज्यरस्ता, पण त्याची पूर्ण आबाळ झाली होती. उंच उंच झाडं (आज यावर कोणाचा विश्वास बसणार नाही), नागमोडी विळखे घेत जाणारा सुस्त रस्ता. रस्त्याच्या अवती भोवती आजच्यासारखी फार्म हाऊसेसची गर्दी नव्हती. त्यामुळे जंगलच जंगल! अचानक एका वळणावर एक पांढरीशुभ्र आलिशान गाडी उभी असलेली दिसली, (बहुधा मर्सिडीज असावी). डा्रयव्हरच्या बाजूच्या काचा उघड्या होत्या, वायपर सुरू होता, पण ड्रायव्हर कुठेच दिसत नव्हता. मी अचंबित! मोटारसायकल बाजूला उभी केली, म्हटलं काय प्रकार आहे ते पाहू या. चेहर्‍यावरचं पाणी पुसून मी इकडेतिकडे पहात उभा राहिलो. पाऊस कोसळतच होता. ओढे नाले खळाळत वहात होते. जवळून एक पायवाट खालच्या अंगास उतरत होती, लाल पाणी घेऊन सजत होती. आणि दुरून एक परिचित असा भारदस्त गायनाचा आवाज आला. दणदणीत आवाजात कोणीतरी ताना, मात्रा, पलटे घेत मल्हाराचे सूर आळवत होता. आवाजाच्या दिशेने मी झपाटल्यासारखा खेचला गेलो.

समोरच्या पायवाटेवर थोडंसं पुढे एक आंब्याचं डेरेदार झाड होतं. झाडाभोवती एक नैसर्गिक पार तयार झालेला होता. आणि त्या पारावर बसून कोसळत्या पर्जन्यधारा अंगावर घेत एक भरभक्कम व्यक्तिमत्व
Mayboli (Marathi Typing Software)
गात बसलं होतं. स्तंभित होऊन मी पहात उभा राहिलो. स्वतःच्या अंतर्मनातील नादब्रह्माच्या गाभार्‍यातील तानपुर्‍याच्या तारा छेडत मल्हार आळवित होते पंडित भीमसेन जोशी!!
पूर्वेस सह्याद्रीचे उंच कडे, दाट झाडी, कोसळता पाऊस, कडाडत्या वीजा आणि विश्वब्रह्माच्या विराट रूपात एकरूप झालेले स्वरब्रह्म भीमसेन जोशी!!

आज त्यांना कदाचित हा प्रसंग आठवणारही नाही. खरं आहे, अमृतवर्षावाला थोडंच माहित असतं, की, अमृत कुठं कुठं साडतं आहे. पण तो वर्षाव, त्या कणांना टिपण्याचं भाग्य लाभलेल्या आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या आयुष्याला अमृतमय करतो!!
 
नीतिन दत्तात्रेय आरेकर
कर्जत-रायगड

 

Please Use This Link To Refer This Article : http://articles.marathisrushti.com/?article=186


IMP Note: Contents on this website are uploaded by individual users who have been provided access to do so. While we respect the copyrights, Marathisrushti.com does not accept any responsibility of any copyright violation where the content/ image has been uploaded by any of our registered user. If any content/image contained on this site violates any copyrights, please notify us so that we can take further corrective action.



नविन प्रतिक्रिया

 shantaram wayadande.  
angavar sare ananara prakar hota Va manala sukhad dhaka denari gost vatali.......DHANYVAD.

Date : 29-04-2010

 Anuja Parab  
kharacha khupa chan lihlay tumhi

Date : 17-04-2010

 Sushil  
Khup chan Lekh Lihila Ahe. asech romantic Story lekh Vachayla Avadtil. Jyaprakare E-Sakal Edition madhe Yetat Tase Lekh Dyave. Mazyakadun Nehmi Pratikriya Miltil.

Date : 17-03-2010



नीतिन दत्तात्रेय आरेकर
नीतिन आरेकर हे मुंबईजवळील उल्हासनगरच्या चांदिबाई महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक आहेत. त्यांचे वास्तव्य कर्जत येथे असून अनेक वृत्तपत्रांमध्ये नियमितपणे स्तंभलेखन चालू असते. त्याच्याशी संपर्क nitinarekar@gmail.com या इ-मेल पत्त्त्यावर होऊ शकतो.


आपली प्रतिक्रिया कळवा
 
आपल्या मित्रांना कळवा
Typing Language:
Select Keyboard:

मराठीसृष्टीचे लेखक
नीतिन आरेकर,प्राध्यापक

नीतिन आरेकर हे मुंबईजवळील उल्हासनगरच्या चांदिबाई महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक आहेत. त्यांचे वास्तव्य कर्जत येथे असून अनेक वृत्तपत्रांमध्ये नियमितपणे स्तंभलेखन चालू असते.




 
© 2010 Langindia Infoservices Private Limited
 
 
Technology and Hosting Services Provided by Mastermind Technologies
(Best viewed @ 1024x768 Resolution and up,Recommended Browser IE 6.0 +)
 


A Marathi Mega Web Portal covering every aspect of marathi people, marathi community, marathi articles, marathi literature, Maharashtras culture, travel, arts, anything and everything about Marathi and Maharashtra. List yourself in Marathi Vyakti Sandarbh Kosh, the first and only Marathi People Encyclopedia. Marathi a regional language of India, is widely spoken in western India. Create you own blog, write articles post comments and much more.