संगणकातल्या पसार्‍याची आवराआवर - मराठीसृष्टी (Marathisrushti) : विशेष लेख:विज्ञान / तंत्रज्ञान


Members Login :
Login ID :
Password :
   

Mayboli (Marathi Typing Software)

संगणकातल्या पसार्‍याची आवराआवर
........निनाद प्रधान   



हे नवीनच शिर्षक वाचून आश्चर्य वाटलं? खरं आहे. संगणकावर काही पसारा असू शकतो याचं भानच आपल्याला बऱयाचदा नसतं. एकदा का संगणक घरी आला की त्याच्यावर पाहिजे तेवढी माहिती ठेवायची आपल्याला घाई होते. कधीतरी-कुठेतरी, कोणाकडून ऐकलेले शेकडो प्रोग्रॅम्स - बहुधा ज्याच्याकडून संगणक घेतलाय त्याच्याकडूनच - आपल्या संगणकावर घालून घेतले जातात. यात आपल्या गरजेचे किती आणि अनावश्यक किती याचा आपण विचारच करत नाही.
 
सध्याच्या संगणकात साधारणपणे 160 जीबीची हार्डडिस्क असते. त्यामुळे ठेवा काहीही... जागा तर भरपूर आहे याकडेच सगळ्यांचा कल असतो. घरी संगणक घेणाऱयांपैकी 50 टक्के लोक त्याचा वापर इंटरनेट, इ-मेल, गेम्स आणि सर्वसाधारण स्वरुपाचा पत्रव्यवहार यासाठीच करतात. मात्र अशा लोकांच्या संगणकाच्या हार्डडिस्कमध्ये डोकावून पाहिले तर काय दिसते? कोणाकडे पेजमेकर, कोणाकडे कोरलड्रॉ, कोणाकडे एमएस ऑफिस 2007..... कुठे गेम्स तर कुठे गाणी, सिनेमा आणि इतर बरंच काही. याचा खरोखर उपयोग किती होतो आणि किती नाही हा प्रश्नच आहे. आपण काय काम करणार आहोत आणि त्यासाठी कोणत्या प्रोग्रॅम्सची गरज आहे याचं भान ज्याने-त्याने ठेवायलाच पाहिजे. संगणकावरच्या जागेचं व्यवस्थापन हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि तेच खरंतर दुर्लक्षिलं जातं हे मात्र तितकंच खरं.
 
थोडं आपल्या घराकडे वळून बघुया आणि मग आपल्याला जागेच्या व्यवस्थापनाचा अंदाज येईल. आपल्या घरात कितीही जागा असेल तीसुद्धा आपल्याला कमीच वाटते. एखादी खोली आणखी असती तर किती बरे झाले असते असं आपल्याला वाटतंच ना?
आणि जास्त जागा नसली तरीही आपण आपलं सामान कमी करण्याच्या ऐवजी वाढवतंच असतो. पण एक दिवस असा येतो की असं सामान साठवायची आपल्या घराची क्षमताच संपते आणि आपल्याला नाईलाजानं का होईना, काही सामान काढावंच लागतं.
संगणकावरच्या जागेचंपण असंच आहे. 160 जीबी असली तरीही कमीच वाटते. अगदी 2 हार्डडिस्क लावल्या तरीही कमीच. पण शेवटी प्रत्येक गोष्टीला काही मर्यादा आहेतच ना? त्यामुळे दुसरीही हार्डडिस्क भरली की मग काय? तेव्हा संगणकावरच्या जागेचं व्यवस्थापन सुरुवातीपासूनच केलं तर ऐनवेळी जागा नाही त्यामुळे काम करता येणार नाही अशी परिस्थितीच येणार नाही. संगणकावरच्या जागेचं हे व्यवस्थापन कसं करायचं ते पाहू.
 
बऱयाचदा एखाद्या सॉफ्टवेअरचे नवे व्हर्जन आले की आपल्याला ते वापरण्याचा मोह होतो. त्याचा आपल्याला उपयोग किती हा भाग वेगळाच, उदाहरण द्यायचे तर एमएस ऑफिसचे बघुया. गेल्या दोन-तीन वर्षात एमएस ऑफिसची नवनवी व्हर्जन्स बाजारात आली. यातील सर्वात आधुनिक म्हणजे ऑफिस 2007. हे व्हर्जन अत्याधुनिक सुविधा आपल्याला देते हे मान्य, पण या सुविधा आपण वापरणार आहोत का हेसुद्धा पहाणे महत्त्वाचे आहे. एमएस ऑफिस 2007 हे सामान्य काम करण्यासाठी इतके क्लिष्ट आहे की विचारायची सोय नाही. सर्व मेनूज बदलल्यामुळे आपल्या सवयीचे क्रीन दिसत नाहीत. सामान्य माणूस गोंधळून जातो. अशावेळी एमएस ऑफिस 2003 किंवा ऑफिस एक्सपी वापरणे केव्हाही चांगले. एमएस ऑफिसला बाजारात आलेला नवा पर्याय म्हणजे ओपन ऑफिस हा मोफत उपलब्ध असलेला ऑफिस सूट. हासुद्धा वापरुन बघायला हरकत नाही.
 
सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जे प्रोग्रॅम्स नेहमी लागणार आहेत तेच संगणकावर घालून घ्या. अनावश्यक प्रोग्रॅम घालुन घेण्याचा मोह टाळा. यामुळे आपल्या भविष्यातल्या अनेक समस्या नाहिशा होण्यात मदत होईल. अनावश्यक प्रोग्रॅम्समुळे आपल्या संगणकाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो हे आपल्याला माहित आहे का? अनावश्यक असलेल्या अशा प्रोग्रॅम्समुळे आपला संगणक बऱयाचदा हळू काम करतो आणि आपण मात्र संगणक बिघडलाय असं समजून हार्डवेअर इंजिनिअरला बोलावतो.
 
अनेकदा आपण संगणकावरचे काही प्रोग्रॅम्स काढून टाकतो - म्हणजेच अनइन्स्टॉल करतो. मात्र असे करताना त्या प्रोग्रॅमशी संबंधित सर्वच फाईल्स आपल्या संगणकावरुन काढल्या जात नाहीत. संगणकावर इन्स्टॉल करताना अनेक प्रोग्रॅम्सनी संगणकाच्या रजिस्ट्रीमध्ये काही फेरफार केलेले असतात तेही प्रोग्रॅम काढून टाकताना तसेच राहून जातात. यामुळेही संगणकाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो.. संगणक हळू चालतो. संगणकाच्या रजिस्ट्रीमधील अशा फेरफारांना रजिस्ट्री एन्ट्री असे म्हणतात. अनावश्यक अशा रजिस्टी एन्ट्री काढून टाकण्यासाठी आता अनेकविध सॉप्टवेअर आणि टूल्स उपलब्ध आहेत. त्यातील काहींची माहिती खाली दिलेली आहे.
 
आपण संगणकावर काम करताना बऱयाचदा काही फाईल्स तात्कालिक स्वरुपात (टेंपररी) बनविल्या जातात. यांचे एक्सटेंन्शन साधारणपणे टीएमपी ( .tmp )असे असते. या टेंपररी फाईल्स वेळोवेळी काढून टाकणे म्हणजे आपला संगणक फिट ठेवण्यासारखे आहे. इंटरनेट एक्सप्लोररसारख्या ब्राऊझरद्वारेही अनेक टेंपररी फाईल्स बनतात ज्या  C:Documents and SettingsusernameLocal SettingsTemporary Internet Files   याठिकाणी साठवल्या जातात. याही फाईल्स वेळोवेळी काढून टाकणे आपल्या हिताचे आहे कारण त्यामुळेही आपल्या संगणकाची कार्यक्षमता बऱयाच प्रमाणात
Mayboli (Marathi Typing Software)
वाढते. यातील username म्हणजे आपण ज्या नावाने संगणकात प्रवेश करतो ते असते.
 
ऑडिओ आणि व्हिडिओ फाईल्स, गेम्स यामुळेही संगणकावरची बरीच जागा अनावश्यकरित्या अडवली जाते. अशा फाईल्सना सीडी किंवा डिव्हिडीवर वर ठेवणे केव्हाही चांगले. सध्या सिडी 10 रुपयात आणि डिव्हिडी 15 रुपयात मिळते त्यामुळे हार्डडिस्कवरची मौल्यवान जागा अडविण्यापेक्षा सिडी-डिव्हिडी वापरणे उत्तम.
 
आपली मेलबॉक्स ही साफसफाई करण्याची आणखी एक जागा. आउटलुक वगैरेसारख्या मेल क्लाएंटमध्ये आपण मेल डाऊनलोड करुन ठेवतो. यात अनेकदा अनावश्यक मेल्स ज्यांना स्पॅम असे म्हटले जाते, त्यांची संख्या मोठी असते पण त्याकडे दुर्लक्ष होते. अशी अनावश्यक मेल्स वेळोवेळी आपल्या मेल क्लाएंटमधून काढून टाकणे हेसुद्धा आपला संगणक फिट ठेवण्यात मोलाची भुमिका बजावते.
अनेकदा संगणकाचा डेस्कटॉप असा भरलेला असतो की आपल्याला हवा तो आयकॉन शोधणेच कठीण होउन जाते. भरलेल्या डेस्कटॉपमुळे संगणकाच्या कार्यक्षमतेवर बराच परिणाम होतो. संगणक सुरु होण्यासाठीही बराच वेळ लागतो. डेस्कटॉप जास्तीतजास्त मोकळा ठेवणे संगणकाच्या आणि आपल्याही हिताचे.
 
इंटरनेट सर्फिंग करताना बऱयाचदा आपण फाईल्स, प्रोग्रॅम्स वगैरे डाऊनलोड करतो. यांचे नीट व्यवस्थापन करणे अत्यावश्यक आहे. अशा डाऊनलोड केलेल्या फाईल्स सीडी किंवा डिव्हिडीवर घेणे उत्तम. त्यांचे विषयानुसार, कामानुसार वर्गिकरण करणे आणखीच उत्तम. ज्या फाईल्सची आवश्यकता नसेल त्या सरळ संगणकावरुन काढून टाकणेही चांगले.
 
संगणकावरील जागेचे व्यवस्थापन या विषयाचा आवाका एवढा मोठा आहे की एकाचवेळी सगळंच लिहिणं शक्य नाही. तेव्हा उरलेला भाग पुढच्या लेखात.

Please Use This Link To Refer This Article : http://articles.marathisrushti.com/?article=86


IMP Note: Contents on this website are uploaded by individual users who have been provided access to do so. While we respect the copyrights, Marathisrushti.com does not accept any responsibility of any copyright violation where the content/ image has been uploaded by any of our registered user. If any content/image contained on this site violates any copyrights, please notify us so that we can take further corrective action.



नविन प्रतिक्रिया

 sagar gade  
THIS IS GOOD INFOEMATION IN THE COMPUTER MANAGMENT. AND USE TO THE MY PC.
THANK YOU!

Date : 01-09-2010

 arun date  
अत्यंत प्राथमिक गोष्टी परंतु ज्या सर्वसाधारणपणे माहित असतात परंतु त्याचे महत्व आपण सर्वसामान्य युजर्स अजिबात जाणत नाही त्यांना या बाबींचे महत्व समजेल असे वाटते.

Date : 10-07-2010

 S.R.KANDALGAONKAR  
very nice to read your article on SANGANAK PASARA ! I am eager to read further !!

Date : 30-06-2010



निनाद प्रधान
मराठी आणि इतर भारतीय भाषांमधील इंटरनेट तंत्रज्ञान तसेच इतर अनेक सॉफ्टवेअरची निर्मिती.  अनेक वेबसाईटच्या निर्मितीत सहभाग. याच विषयावर विपुल लेखन. मराठी वृत्तपत्रांच्या इंटरनेट आवृत्तींचे सल्लागार. मराठीसृष्टीचे व्यवस्थापकीय संचालक.


आपली प्रतिक्रिया कळवा
 
आपल्या मित्रांना कळवा
Typing Language:
Select Keyboard:

मराठीसृष्टीचे लेखक
निनाद अरविंद प्रधान
इंटरनेट आणि संगणक सॉफ्टवेअर सल्लागार, व्यावसायिक

मराठी आणि इतर भारतीय भाषांमधील इंटरनेट तंत्रज्ञान तसेच इतर अनेक सॉफ्टवेअरची निर्मिती.  अनेक वेबसाईटच्या निर्मितीत सहभाग. याच विषयावर विपुल लेखन. मराठी वृत्तपत्रांच्या इंटरनेट आवृत्तींचे सल्लागार. मराठीसृष्टीचे व्यवस्थापकीय संचालक.




Mayboli (Marathi Typing Software)
 
© 2010 Langindia Infoservices Private Limited
 
 
Technology and Hosting Services Provided by Mastermind Technologies
(Best viewed @ 1024x768 Resolution and up,Recommended Browser IE 6.0 +)
 


A Marathi Mega Web Portal covering every aspect of marathi people, marathi community, marathi articles, marathi literature, Maharashtras culture, travel, arts, anything and everything about Marathi and Maharashtra. List yourself in Marathi Vyakti Sandarbh Kosh, the first and only Marathi People Encyclopedia. Marathi a regional language of India, is widely spoken in western India. Create you own blog, write articles post comments and much more.