मराठी विनोद ...............१४

प्रभाकरला बर्‍याच दिवसात त्याच्या साहेबांनी पगारवाढ दिली नव्हती. पण प्रभाकरचा स्वभाव मूळचा भिडस्त असल्यामुळे विचारायचे कसे हा त्याला प्रश्न होता. पण एक दिवस हिमत करून त्यानी साहेबांना विचारले, ‘‘साहेब, माझी बायको म्हणाली की, साहेबांना विचारा पगार वाढवता का म्हणून ?’’ त्यावर त्याच्या साहेबांनी उत्तर दिले, ‘‘मग मी ही माझ्या बायकोचा सल्ला घेऊन तुला कळवतो ?’’


Read More